'मी'' पणाचा त्याग
एकदा एक नागपाल नावाचा प्रवासी विविध देशांना भेटी देण्याच्या दृष्टीने बाहेर पडला होता. दूरदूरची ठिकाणे जवळून पाहावीत, त्याची माहिती जाणून घ्यावी अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने बरोबर कोणालाही घेतले नाही. एकट्यानेच तो सर्व प्रवास करत होता. अनेक दिवस त्याचा प्रवास चालूच होता. दिवसभर चालायचे आणि रात्री एखाद्या ठिकाणी मुक्काम करायचा असा त्याचा नियम होता. एकदा प्रवासात त्याला वेळेचे भानच राहिले नाही व चालत जात असताना रात्र झाली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाव मागेच राहिले आहे आणि आता आपण जंगलात आहोत. जंगली श्वापदांचे आवाज ऐकू येऊ लागले व त्याला भीतीच वाटू लागली. थोडे अंतर तशाच भीतीच्या वातावरणात चालत होता. पुढे गेल्यावर त्याला एका झोपडीतून कंदीलाचा प्रकाश दिसून आला. त्या प्रकाशाच्या रोखाने तो चालत गेला व पाहिले तर झोपडीचे दार बंद होते. नागपालने झोपडीजवळ उभे राहून हाक मारली. आतून आवाज आला,''कोण आहे'' नागपालने उत्तर दिले,'' मी आहे'' त्यानंतरही झोपडीचे दार उघडले गेले नाही. त्याने परत आवाज दिला, परत तोच प्रश्न आला व नागपालने यावेळीही ''मी आहे'' असे उत्तर दिले. पुन्हा झोपडीचे दार बंदच राहिले. असे चारपाचवेळेला झाल्यावर नागपालने पुन्हा दार ठोठावले तेव्हा आतून पुन्हा कोण आहे असे विचारताच त्याने ''दारात नागपाल नावाचा प्रवासी उभा असून रात्रभरासाठी विश्रांती द्यावी अशी विनंती करतो'' असे उत्तर देताच झोपडीचे दार पटकन उघडले गेले. झोपडीत एक साधूमहाराज राहात होते. त्यांनी नागपालला आत घेतले व सांगितले,''मित्रा या झोपडीत ''मी''पणाला स्थान नाही. माझप्रवासी आहेस तर आरामात राहा.''
तात्पर्य – ''मी'' पणाला कोठेही स्थान नसावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा