रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

एक चिंतन

      माणसाला परमेश्वराने सार काही दिल पण देताना मात्र त्याने कुणाला भरभरून सुख दिले.  कुणाच्या नशिबी अवहेलना, दु:ख प्रत्येक माणसाला घडविण्यामागे परमेश्वराचा चैतन्याचा काय उद्देश असेल संकटाच्या दरया पार करत आपल इच्छित धैर्य गाठण्यासाठी धडपडत, संघर्ष करत जीवन जगत असतो, तर कुणी नशिबाच्या साथीने यशाचे शिखर गाठतो.
      प्रत्येक जण जगत असतो.  प्रत्येक जण सुखासाठी धडपडत असतो.  प्रत्येकाच्या मागे प्रेरणा असते.  हा  परमेश्वर नावाचा बहुरूपी मात्र आपल्या सगळ्यांना त्याच्या इशा-यावर नाचवतो.  त्याच्या मनात पुढच काय आहे हे कुणालाच ठाऊक नसत.  अद्यापपर्यंत त्याचा कोणीच शोध लावू शकला नाही.
      विज्ञानाने मानवाने अनेक शोध लावले पण त्याचा शोध मात्र कोणालाही लागला नाही.  नाहीतर आपण अनेक नैसर्गिक संकटाना थोपवू शकलो नसतो का?  कर्ता करविता तो आहे.  सर्व काही त्याच्याच हातात आहे.  आपण फक्त कटपुतली प्रमाणे त्याचा इशा-यावर नाचत असतो.  देव कसा आहे?  कोठे आहे?  तो काय करतो?  किवा काय करणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही.  म्हणजे त्याची कल्पना पण आपण करू शकत नाही.  ईश्वर महान आहे.  ज्याप्रमाणे एखाद्या महासागराकडे पहिले असता त्याची सीमा कुठपर्यंत आहे हे लक्षात येत नाही जिकडे नजर फिरवावी तितके ते लांब वाटते किवा क्षितिजाकडे पाहिल्यानंतर कसे भासते कोठेतरी ते क्षितीज टेकले आहे.  पण तसे नसते.  ते आपल्याला तसे भासते.  कारण हे सगळ आपल्या विचारा पलीकडच आहे.
 

आजचा सुविचार

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
 

आजची बोधकथा

एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांगमी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते! 

तात्पर्य : काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा