हसत खेळत शिक्षण नवीन माहितीसाठी येथे क्लीक
सुविचार
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
संशयी स्वभाव वाईट
एका संशयी मालकाचा नोकरावरच नव्हे तर आपल्या घरच्या माणसांवरही विश्वास नव्हता. एकदा त्याने आपल्या विधवा भावजयीला मदत व्हावी म्हणून पुतण्याला आपल्याकडे नोकरीस ठेवून घेतले. आपला पुतण्या प्रामाणिक आणि मेहनती असल्याचे ठाऊक होते पण संशयी स्वभावामुळे त्याने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. पुतण्या जेथे बसत होता तेथे त्याने गुपचुपपणे पैसे ठेवून दिले. पुतण्याने पैसे बघितले आणि मालकास परत दिले. दुस-या दिवशीही हाच प्रकार घडला. पुतण्याने जास्तीचे पैसे परत केले. तिस-या दिवशी मालक आपली नियत तपासत असल्याचे पुतण्याच्या लक्षात आले. त्याला काकांच्या वागण्याचे वाईट वाटले परंतु त्याने काहीही न बोलता पुन्हा परत केले. परत पुन्हा पुन्हा तोच प्रकार घडून येऊ लागल्याने पुतण्या वैतागुन गेला. एक दिवशी तो पैसे घेऊन काकाकडे गेला व म्हणाला,''काकाजी हे घ्या तुमचे एक लाख रूपये आणि तुमची नोकरीही परत घ्या. तुम्ही मला इतके दिवस मदत केली म्हणून मी या प्रामाणिकपणे काम करत होतो पण त्याच्यावरच तुम्ही अविश्वास दाखवत गेलात. सतत अविश्वास दाखवून कोणाचा विश्वास जिंकता येत नाही. मला आता तुमच्याकडे काम करण्यात कोणताही रस नाही.'' एवढे बोलून तो मेहनती व प्रामाणिक पुतण्या नोकरी सोडून निघून गेला. मालकाला संशयी स्वभावाबद्दल धडा मिळाला.
तात्पर्य :- संशयी स्वभाव असल्यामुळे अनेकदा नुकसानच झाल्याचे दिसून येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा